सावदा येथिल स्वामीनारायण मंदिरात हरिकृष्ण व राधाकृष्ण देवांना उबदार कपडे
सावदा येथिल स्वामीनारायण मंदिरात हरिकृष्ण व राधाकृष्ण देवांना उबदार कपडे
सावदा प्रतिनिधी : लेवा जगत न्यूज-
सावदा येथील श्री स्वामीनारायण मंदिरात थंडीच्या आगमनानिमित्त हरिकृष्ण महाराज व राधाकृष्ण देवांना उबदार टोपी,स्वेटर कपडे परिधान करण्यात आले. ऋतुचक्रानुसार देवांचे शृंगार आणि वस्त्र बदलण्याची सुंदर परंपरा यंदाही मोठ्या भक्तिभावाने पार पडली.
भगवंतांचा हा सुंदर थंडीतील शृंगार पुजारी सत्यप्रकाश दासजी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी मंदिराचे कोठारी स्वयंप्रकाश दासजी, तसेच धर्म किशोरदासजी आणि माधव स्वामी यांची उपस्थिती लाभली. संपूर्ण कार्यक्रम परमपूज्य शास्त्री भक्तीप्रकाश दासजी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
पहाटेच्या आरतीनंतर हरिकृष्ण महाराजांना उबदार कपडे तर राधाकृष्ण देवांना आकर्षक व रंगीत कपडे परिधान करण्यात आले. थंडीच्या या दिवसांत देवांचे हे साजिरे रूप पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तांनी दर्शन घेतले.
मंदिरातील सेवकांनी सांगितले की, “देव हा आपल्या घरातीलच सदस्य आहे. ऋतुनुसार त्याला योग्य पोशाख आणि सेवा देणे ही आमची परंपरा असून, भक्तिभावाने ती पुढेही जोपासली जाईल.”

कोणत्याही टिप्पण्या नाहीत