खासदार क्रीडा महोत्सव २०२५ – ‘खेलो रावेर’चा भव्य समारोप
खासदार क्रीडा महोत्सव २०२५-‘खेलो रावेर’चा भव्य समारोप
लेवाजगत न्यूज | भुसावळ
यांच्या पुढाकारातून भुसावळ येथे आयोजित “खासदार क्रीडा महोत्सव २०२५ – खेलो रावेर” या भव्य क्रीडा महोत्सवाचा समारोप यांच्या मार्गदर्शनाने अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. युवक-युवतींमध्ये क्रीडासंस्कृती रुजावी, त्यांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उदात्त हेतूने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
केंद्रीय राज्यमंत्री, युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय तसेच रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या रक्षाताई खडसे यांच्या संकल्पनेतून दि. २३ ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत हा क्रीडा महोत्सव यशस्वीरीत्या पार पडला. समारोप कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न यांना जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
या समारोपप्रसंगी , आमदार , भाजपा जिल्हाध्यक्ष , डॉ. राजेंद्र फडके यांच्यासह रावेर लोकसभा क्षेत्रातील भाजपा व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी तसेच मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विविध क्रीडा प्रकारांतील विजेत्या खेळाडूंना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
विशेष म्हणजे, प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या क्रीडा महोत्सवात रावेर लोकसभा क्षेत्रातील १० तालुक्यांमधील तब्बल ६,५०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला. त्यामुळे हा महोत्सव रावेर लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात मोठे क्रीडा आयोजन ठरल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
या क्रीडा महोत्सवामुळे युवकांमध्ये आरोग्य, शिस्त, संघभावना आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित होण्यास निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. “खेळ हीच खरी ऊर्जा असून, क्रीडाक्षेत्रातून घडलेली पिढी देशाच्या विकासात मोलाची भूमिका बजावेल,” असा संदेश या निमित्ताने देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत