मतदार यादीत आपले नाव शोधा,महाराष्ट्रातील सर्व पालिका निवडणूक २०२५ -ऑनलाइन सुविधा उपलब्ध, महत्त्वाची मार्गदर्शक माहिती
महाराष्ट्रातील सर्व पालिका निवडणूक २०२५ : मतदार यादीत नाव शोधा -ऑनलाइन सुविधा उपलब्ध, महत्त्वाची मार्गदर्शक माहिती
लेवाजगत न्यूज मुंबई : महाराष्ट्रातील सर्व पालिका निवडणूक २०२५ आता काहीच आज असून संपूर्ण राज्यात निवडणूक वातावरणाला जोरदार वेग आला आहे. लोकशाही महोत्सवाचा उत्साह वाढत असताना, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र प्रत्येक मतदाराचे नाव मतदार यादीत निश्चित असणे अत्यावश्यक आहे. कोणताही नागरिक मतदानापासून वंचित राहू नये यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाइन मतदार यादी शोध सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
नागरिकांनी मतदार यादित नाव शोधण्यासाठी उपलब्ध अधिकृत लिंकवर क्लिक करून, आपला मतदारसंघ निवडावा किंवा EPIC / इलेक्शन कार्ड क्रमांक, पूर्ण नाव, जन्मतारीख किंवा पत्ता टाकून आपले नाव तपासावे. मोबाईल किंवा संगणकाद्वारे घरबसल्या काही सेकंदांत ही प्रक्रिया पूर्ण करता येते.
नवीन मतदार, पत्ता बदललेले नागरिक, नाव सुधारणा केलेले, तसेच स्थलांतरित व्यक्तींनी विशेष लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मतदार शोध प्रणालीमध्ये केवळ स्वतःच्या नावासाठी EPIC / नाव / पत्ता तपशील भरल्यास संबंधित व्यक्तीचे नाव, पालकांचे नाव, मतदान केंद्र माहिती दिसते.
खाली दिलेले लिंक ओपन करा व आपले नाव शोधा
https://mahasecvoterlist.in/ObjectionOnClick/SearchName

कोणत्याही टिप्पण्या नाहीत