Contact Banner

सावदा येथे राष्ट्रवादीच्या विजया कुशल जावळे यांचा घराघरांत प्रचार, घड्याळ चिन्हाचा जोरदार प्रसार

savda-palika-nivadnuk-vijaya-kushal-javle-gharguti-prachar


सावदा येथे राष्ट्रवादीच्या विजया कुशल जावळे यांचा घराघरांत प्रचार, घड्याळ चिन्हाचा जोरदार प्रसार

लेवाजगत न्यूज सावदा | प्रतिनिधी
सावदा नगरपालिका निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार चार प्रभागांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू असून, प्रत्यक्ष प्रचारालाही आता वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार व माजी नगरसेविका विजया कुशल जावळे यांनी घरोघर जाऊन मतदारांशी थेट संपर्क साधत प्रचार सुरू केला आहे.

सदर निवडणूक प्रक्रियेदरम्यान यापूर्वी प्रचार सुरू असतानाच निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर नगराध्यक्ष पदासह प्रभाग क्रमांक चार मद्ये नगराध्यक्ष व चार ब या जागेसाठी मतदान झाले. माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता पुन्हा एकदा प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली असून, येत्या २० तारखेला मतदान होणार आहे.

जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे, तसतसा प्रचारही हळूहळू जोर पकडताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार विजया कुशल जावळे या स्वतः घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या प्रचारात त्यांचे पती, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष कुशल सुरेंद्र जावळे, तसेच पक्षाचे कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी झालेले दिसत आहेत.

याशिवाय सोशल मीडियावरही त्यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रचाराचे फोटो व संदेश सातत्याने शेअर केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची घड्याळ ही निवडणूक निशाणी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्यावर भर देत, मतदारांनी घड्याळ चिन्हासमोर मतदान करावे, असे आवाहन विजया कुशल जावळे व त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.

एकूणच घराघरांत पोहोचणारा थेट प्रचार, कार्यकर्त्यांची साथ आणि सोशल मीडियावरील उपस्थिती यामुळे राष्ट्रवादीच्या विजया कुशल जावळे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र सध्या सावद्यात दिसून येत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.