Contact Banner

अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे शिवजयंतीनिमित्त जिल्हास्तरीय महावकृत्व स्पर्धा

 

अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे शिवजयंतीनिमित्त जिल्हास्तरीय महावकृत्व स्पर्धा

अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे शिवजयंतीनिमित्त जिल्हास्तरीय महावकृत्व स्पर्धा

स्पर्धेचे यंदा नववे वर्ष

लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य व विचार बालमनावर रुजावेत या उद्देशाने अंतर्नाद प्रतिष्ठान, भुसावळ यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त जळगाव जिल्हास्तरीय महावकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गुरुवार, १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता ताप्ती पब्लिक स्कूल (नहाटा कॉलेज शेजारी), जामनेर रोड, भुसावळ येथे होणार असून यंदा स्पर्धेचे नववे वर्ष आहे.

स्पर्धा पाच गटांत होणार असून प्रत्येक गटातील तीन विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहन दिले जाणार आहे.

गट व विषय पुढीलप्रमाणे :

  • गट १ (इयत्ता १ ली व २ री) – वेळ २ मिनिटे : छत्रपती शिवाजी महाराज
  • गट २ (इयत्ता ३ री व ४ थी) – वेळ ३ मिनिटे : छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण, छत्रपती शिवाजी महाराज यांची गुणवैशिष्ट्ये
  • गट ३ (इयत्ता ५ वी ते ७ वी) – वेळ ४ मिनिटे : गड-किल्ले : शिवशाहीचे सामर्थ्य, छत्रपती शिवाजी महाराज – स्वराज्याचा सूर्योदय
  • गट ४ (इयत्ता ८ वी ते १० वी) – वेळ ५ मिनिटे : छत्रपती शिवाजी महाराज भोसले बोलतोय, शिवशाहीतील लोकशाही तत्त्वे
  • गट ५ (खुला गट) – वेळ ७ मिनिटे : छत्रपती शिवाजी महाराज यांचे कृषी क्षेत्रातील कार्य, जाणता राजा – छत्रपती शिवाजी महाराज

स्पर्धेसाठी नावनोंदणीची अंतिम तारीख १६ फेब्रुवारी २०२६ सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. स्पर्धेच्या दोन फेऱ्या घेण्यात येणार असून पहिल्या फेरीतून प्रत्येक गटातील १० स्पर्धकांची निवड केली जाईल. अंतिम फेरी व बक्षीस वितरण समारंभ १ मार्च रोजी नहाटा महाविद्यालयाच्या लायब्ररी हॉलमध्ये होणार आहे. अंतिम फेरीत स्पर्धकांना पूर्वीचा विषयच सादर करावा लागणार असून त्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जाईल.

अधिक माहितीसाठी प्रकल्प प्रमुख प्रदीप सोनवणे (९८५०१४५३९९), प्रकल्प समन्वयक शैलेंद्र महाजन (९४२३४७६८३७) व सहसमन्वयक विक्रांत चौधरी (७५८८८१५३३७५) यांच्याशी संपर्क साधावा.

उपक्रम समितीत डॉ. संजू भटकर, योगेश इंगळे, जीवन महाजन, ज्ञानेश्वर घुले, प्रसन्ना बोरोले, अमितकुमार पाटील, समाधान जाधव, भूषण झोपे, अमित चौधरी, डॉ. प्रा. श्यामकुमार दुसाने, चंद्रकांत सूर्यवंशी, हितेंद्र नेमाडे, राजू वारके, कुंदन वायकोळे, देव सरकटे, तेजेंद्र महाजन, राहुल भारंबे, ललित महाजन, निवृत्ती पाटील, जीवन सपकाळे, हरीश भट, कपिल धांडे, शिरीष कोल्हे, केतन महाजन, उमेश फिरके, मंगेश भावे, सचिन पाटील, प्रमोद पाटील, योगेश साळुंके तसेच अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांचा समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.