भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्यांचा सकारात्मक प्रतिसाद
भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्यांचा सकारात्मक प्रतिसाद
लेवाजगत न्यूज भालोद— डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगावचे कृषीदुत आणि फैजपूर कृषीकन्या यांच्याकडून भालोद येथे कृषी मेळावा घेण्यात आला.या मेळाव्याला शेतकर्यांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला.
लोकनियुक्त नगराध्यक्षा फैजपूर दामिनी पवन सराफ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष मा.निलेश मुरलीधर राणे, ( फैजपूर), मा. जयश्री नरेंद्र चौधरी (नगरसेविका) मा.पवन अनिल सराफ व मा.राहुल गुजराथी (नगरसेवक, फैजपूर). कृषीभूषण मा.श्री . नारायण बापू चौधरी, प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. भालचंद्र देविदास ढाळे ( मंडळ कृषी अधिकारी, फैजपूर), मा.महेश आगीवाल (उप कृषी अधिकारी, फैजपूर), मा. एस. आर. कंकाळ (सहाय्यक कृषी अधिकारी, भालोद), मा.महेंद्र पाटील (सहाय्यक कृषी अधिकारी), मा. हितेंद्र चौधरी ( सहाय्यक कृषी अधिकारी), मा.सुरेश अंगवार (पशुधन पर्यवेक्षक), मा. मिलिंद चौधरी (असिस्टंट मॅनेजर, महाधन). इ मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मेळाव्याची प्रस्तावना प्रा.बी.एम.गोणशेटवाड यांनी केली. त्यानंतर कृषीदूत ललित वाढी, वैभव चौधरी, भावेश पांडव आणि कृषीकन्या नेत्रा खराटे यांनी मेळाव्याच्या विषयाबद्दल शेतकर्यांना माहिती दिली. प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. भालचंद्र ढाळे (मंडळ कृषी अधिकारी) यांनी महाविस्तार याबद्दल माहिती दिली. कृषीभूषण मा. श्री. नारायण बापू चौधरी यांनी केळी लागवड कशी करावी आणि केळीवर पडलेल्या रोगाचे नियंत्रण कशे करावे याचे योग्य मार्गदर्शन केले. मा. मिलिंद चौधरी यांनी आताच्या काळामध्ये खतामध्ये होणारी फसवणूक आणि पूरक व्यवसायाबद्दल माहिती दिली. मा.गणेश गुरव यांनी शेळीपालन, कुक्कुटपालन याबद्दल शेतकर्यांना मार्गदर्शन केले. मा. सुरेश अंगवार यांनी जनावरांचे पालन आणि त्यांची काळजी कोणत्या प्रकारे करावी याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येशील प्रा. बी. एम. गोणशेटवाड यांच्या हस्ते शेतकर्यांना आकर्षित भेटवस्तू देण्यात आल्या. ार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषीकन्या साक्षी चंद्रकांत काळे आणि मिनल कवडुजी कार्लेकर तर कृषीकन्या विशाखा संजय रायकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत