कलर मराठी वाहिनीने अंधश्रद्धा पसरविल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी : अंनिसची मागणी
कलर मराठी वाहिनीने अंधश्रद्धा पसरविल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी : अंनिसची मागणी
उरण: सुनिल ठाकूर-कलर मराठी वाहिनी कडून अंधश्रद्धा पसरविली गेल्याने त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी व समाजात चुकीचा संदेश जाईल असे प्रसारण करू नये अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. तसे त्यांनी संबंधितांना निवेदन पाठविले आहे
कलर मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठी हा महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या आवडीचा व लोकप्रिय कार्यक्रम आहे. त्याद्वारे बहुजन कलाकारांना आपण लोकप्रियता मिळवून दिली आहे.त्याचा सहावा सीज़न आता चालू आहे.पण त्यात अंधश्रद्धा पसरवली गेली आहे.दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या २५ व्या भागात अंधश्रद्धायुक्त प्रसंगाचे प्रसारण झाले आहे.
त्यामध्ये कलाकारांची नजर उतरविण्याचे दृश्य आहे. काही शब्द पुटपुटत मिरची कलाकाराच्या शरीरावरून ओवाळून गॅसवरील तव्यावर टाकली असल्याचे दिसत आहे.
खरं तर ही अतिशय गंभीर बाब असून ती निखालसपणे अंधश्रद्धा आहे.यामुळे प्रेक्षकांच्या मनात अंधश्रद्धा रुजण्याचा धोका संभवतो.ही बाब वाहिनीसह दिग्दर्शक व पुरोगामी विचाराचे निवेदक रितेश देशमुख यांच्या नजरेतून सुटली गेली किंवा त्याचे गांभीर्य त्यांना समजले नाही.
तरी त्यांनी ही चूक सुधारून तसे निवेदन त्यांच्या येणाऱ्या भागात प्रसिद्ध करावे म्हणजे प्रेक्षकांना मनात अंधश्रद्धा बळावण्याचा धोका टळेल. असे अंनिसने निवेदनात म्हटले आहे.
या विषयी सकारात्मक विचार करून या पुढे अंधश्रद्धायुक्त प्रसंगांची दृश्य सदर वाहिनीवर प्रसारित केले जाणार नाहीत, उलट अंधश्रद्धांच्या विरोधात प्रबोधन करावे असेही पुढे म्हटले आहे. निवेदनावर राज्य प्रधान सचिव डॉ टी आर गोराणे व राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत