Contact Banner

जामनेरात मोठा निर्णय : शहरातील दोन प्रमुख मार्ग ‘नो हॉकर झोन’ घोषित

 

जामनेरात मोठा निर्णय : शहरातील दोन प्रमुख मार्ग ‘नो हॉकर झोन’ घोषित

लेवाजगत न्युज जामनेर(नितीन इंगळे):– शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि स्वच्छतेच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी जामनेर नगर परिषदेने ठोस पाऊल उचलले आहे. दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी नगर परिषद सभागृहात भाजी विक्रेते व हातगाडी धारकांची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील दोन महत्त्वाचे मार्ग “नो हॉकर झोन” म्हणून अधिकृतरीत्या घोषित करण्यात आले.

शिवसृष्टी ते गांधी चौक तसेच शिवसृष्टी ते भीमसृष्टी या मार्गांवर आता कोणत्याही प्रकारच्या हातगाड्या, भाजी विक्रेते किंवा फेरीवाल्यांना व्यवसाय करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

नगर परिषद मुख्याधिकारी नितीन बागुल यांनी कायद्यातील तरतुदींचा उल्लेख करत नियमांचे उल्लंघन केल्यास दंड, साहित्य जप्ती तसेच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला. “शहराच्या शिस्तीसाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.

बैठकीस उपनगराध्यक्ष डॉ. प्रशांत भोंडे, नगर परिषद सदस्य तसेच मोठ्या संख्येने हातगाडी धारक उपस्थित होते. डॉ. भोंडे यांनी विक्रेत्यांना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करत, “अतिक्रमणमुक्त, स्वच्छ आणि सुंदर जामनेर घडवण्यासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावी,” असे नमूद केले.

नागरिकांना मोकळे रस्ते, सुरळीत वाहतूक आणि स्वच्छ वातावरण मिळावे या उद्देशाने ही कारवाई महत्त्वाची ठरणार असून, येत्या काळात नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणार असल्याचे नगर परिषदेकडून संकेत देण्यात आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.