Contact Banner

रात्री १० नंतर डीजे वाजवल्याने लॉन मालकास तंबी


ratri-10-nantar-dj-vajvalyane-lawn-malakas-tambi


 रात्री १० नंतर डीजे वाजवल्याने लॉन मालकास तंबी

लेवाजगत प्रतिनिधी भुसावळ-

रात्री १० वाजल्यानंतर डीजे व ध्वनिक्षेपकांचा वापर करू नये, असा इशारा पोलिसांनी मंगलकार्यालाय, लॉन चालक व डीजे चालकांना दिला होता. तरीही वेळ मर्यादेचे उल्लंघन करून वांजोळा रोडवरील एका लॉनमध्ये रात्री उशिरापर्यंत डीजे सुरू होता.

यामुळे ध्वनीप्रदूषण वाढले असून नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेत बाजारपेठ पोलिसांनी संबंधित लॉन व्यावसायिकाला तातडीने पाचारण केले. ही पहिलीच वेळ असल्याने केवळ तंबी देऊन सोडण्यात आले. मात्र, पुन्हा अशी तक्रार आल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

शहरात इतरही ठिकाणी अशा प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी गस्त घालत आहेत, अशी माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.