सावदा येथे संत रविदास जी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
सावदा येथे संत रविदास जी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
लेवाजगत न्युज सावदा : सावदा येथील सोमेश्वर नगरमध्ये संत श्री गुरु रविदास जी महाराज यांची जयंती नुकतीच मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस हार-फुले अर्पण करून व पूजा करून करण्यात आली. यावेळी राजेंद्र श्रीकांत चौधरी यांनी संतांच्या कार्याचा गौरव करत आपले मनोगत व्यक्त केले.
सावदा पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. विशाल पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच नूतन नगरसेवक सचिन भाऊ बऱ्हाटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, गुरु रविदास जी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नमन केले.
दीपप्रज्वलन समाजसेवक गजानन ठोसरे, माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय महाजन, सारिका ताई चव्हाण, नगरसेविका रंजनाताई भारंबे व सुनिता संजय तायडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेविका नंदाबाई लोखंडे, नूतन नगरसेवक विशाल भाऊ सोनवणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधुकर चौधरी, अतुल भाऊ नेहेते, नीरज भाऊ सोनवणे, जो जो भाई तायडे, जे.के. भारंबे, नाना भाऊ संन्यास, संजय तायडे यांसह सोमेश्वर नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम भक्तिमय व उत्साही वातावरणात पार पडला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत