होळी निमित्त भुसावळ–खंडवा व देवळाली–अमरावती मेमू गाड्या धावणार
होळी निमित्त भुसावळ–खंडवा व देवळाली–अमरावती मेमू गाड्या धावणार
लेवाजगत न्यूज प्रतिनिधी भुसावळ -होळी सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने – तसेच – दरम्यान अनारक्षित मेमू (MEMU) विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
भुसावळ–खंडवा मेमू (६ फेऱ्या)
-
गाडी क्र. ०११०२ : २, ३ आणि ४ मार्च रोजी
भुसावळ येथून सकाळी ५.५० वाजता सुटेल व खंडवा येथे ७.५५ वाजता पोहोचेल. -
गाडी क्र. ०११०९ : १, २ आणि ३ मार्च रोजी
खंडवा येथून सायंकाळी ५.१० वाजता सुटेल व भुसावळ येथे रात्री ८.०० वाजता पोहोचेल.
देवळाली–अमरावती मेमू (६ फेऱ्या)
-
गाडी क्र. ०११०३ : २, ३ आणि ४ मार्च रोजी
देवळाली येथून दुपारी १.३५ वाजता सुटेल व अमरावती येथे रात्री ९.३० वाजता पोहोचेल. -
गाडी क्र. ०११०४ : ३, ४ आणि ५ मार्च रोजी
अमरावती येथून पहाटे ५.२० वाजता सुटेल व देवळाली येथे दुपारी १२.४० वाजता पोहोचेल.
होळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी या विशेष मेमू गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत