Contact Banner

सावदा येथे भगवान महावीर जन्मकल्याणक उत्साहात साजरा

savda-yethe-bhagwan-mahavir-janma-kalyanak-utsahat-sajra


सावदा येथे भगवान महावीर जन्मकल्याणक उत्साहात साजरा

लेवाजगत न्यूज सावदा, दि. ३० मार्च २०२६ : -जैन धर्मीयांच्या पवित्र सणांपैकी एक असलेल्या भगवान महावीर जन्मकल्याणकानिमित्त सावदा येथे अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या निमित्ताने सकाळी भगवान महावीर यांच्या मूर्तीचा विधिवत अभिषेक करण्यात आला. मंदिरात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पूजा-अर्चा केली. त्यानंतर शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत भगवान महावीर यांची आकर्षक रथावरून मिरवणूक काढण्यात आली. जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला आणि वातावरण पूर्णतः भक्तिमय झाले.

कार्यक्रमादरम्यान समाजबांधवांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रम शांतता, उत्साह आणि धार्मिक वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमामुळे सावदा शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर, सावदा येथील ट्रस्टी अध्यक्ष डॉ. दीपक सैतवाल, उपाध्यक्ष देवेंद्र जैन, सचिव विमलेश जैन, ट्रस्टी अभिजित मिटकर व योगेश जैन यांनी परिश्रम घेतले. यावेळी समाजबांधव, युवा वर्ग, महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.