Contact Banner

सावद्यात गांजाची १३ झाडे जप्त; पोलिसांची धडक कारवाई

 

savdyat-ganjachi-13-zhade-japt-polisancha-dhadak-karvai


सावद्यात गांजाची १३ झाडे जप्त; पोलिसांची धडक कारवाई

लेवाजगत न्यूज सावदा (ता. रावेर) : सावदा येथील शेतशिवारात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी छापा टाकून १३ गांजाची झाडे जप्त केली आहेत. जप्त केलेल्या गांजाचे वजन सुमारे २८ किलो ४५० ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत १ लाख १४ हजार ३७ रुपये असल्याचे सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार सावदा येथील पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (दि.१०) दुपारी सावदा–फैजपूर मार्गावरील गुरुकुल इंग्लिश स्कूलजवळील बैरंम बुवा देवस्थान परिसरातील गट क्रमांक १६३ मधील शेतात पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणी संशयित निलेश रमेश पाटील (वय ४०, रा. सावदा) यांनी गांजाची लागवड केल्याचे आढळून आले.

कारवाईदरम्यान पोलिसांना शेतात लावलेली १३ गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी ती झाडे जप्त केली असून पंचनामा करण्यात आला. ही कारवाई मुक्ताईनगर येथील फॉरेन्सिक टीमच्या उपस्थितीत पार पडली.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली फौजदार राहुल सानप, तसेच तहसील प्रशासनातील अधिकारी, कृषी विभागाचे प्रतिनिधी आणि सावदा पोलीस स्टेशनचे कर्मचारी संजय चौधरी, राजेंद्र बेदकर, निलेश वाघिसकर, सुनील झांबरे, मनोज तडवी, बबन तडवी आदींनी सहभाग घेतला.

या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.