Contact Banner

दहावी सीबीएसई निकालात गोदावरी स्कूलचे घवघवीत यश साधना राठोड ९७ टक्के गुण मिळवित शाळेतून प्रथम

 

cbse-dahavi-nikal-godavari-school-ghavghavit-yash-sadhana-rathod-97-takke-pratham

cbse-dahavi-nikal-godavari-school-ghavghavit-yash-sadhana-rathod-97-takke-pratham



दहावी सीबीएसई निकालात गोदावरी स्कूलचे घवघवीत यश

साधना राठोड ९७ टक्के गुण मिळवित शाळेतून प्रथम

लेवाजगत न्यूज जळगाव : येथील गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट निकालामुळे शाळेचा लौकिक अधिक उंचावला असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या परीक्षेत साधना राठोड हिने ९७ टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या पाठोपाठ मान्यता कोळी हिने ९६.६०टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच शद्धा माळी (९२.२०टक्के), अथर्व भंगाळे (९१.२०टक्के), यशस्वी मोरे (९१टक्के), ओम चौधरी (९१टक्के), यश महाजन (९१टक्के), हेतिश बोरोले (९०.८०टक्के) आणि भैरवी पाटील (९०टक्के) या विद्यार्थ्यांनीही ९०टक्के पेक्षा जास्त गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. याशिवाय आदर्श परदेशी (८९.४०टक्के), प्राची चौधरी (८९टक्के), ओम शिवराणी (८८टक्के), फरहान देशमुख (८८टक्के), रितेश चाटे (८८.४०टक्के), झैद खान (८८टक्के), आदवेद गांगुले (८७.८०टक्के), जयंत पाटील (८७.४०टक्के), प्रीतेश चौधरी (८७.४०टक्के), प्रतीक पाटील (८६.४०टक्के), वंशिका भांगळे (८५टक्के), विधी शर्मा (८५टक्के) आणि गर्वित मधुकर (८४.६०टक्के) यांनीही उत्कृष्ट गुण मिळवत शाळेचा मान उंचावला आहे. या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, संचालिका डॉ.वर्षा पाटील सचिव डॉ. केतकी  पाटील, हृदयरोगतज्ञ डॉ.वैभव पाटील, शाळेच्या मुख्याध्यापका नीलिमा चौधरी, शिक्षकवर्ग व पालकांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.