Contact Banner

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

icrest-2026-international-conference-concludes-successfully


 आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

लेवाजगत न्यूज जळगाव — गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आणि आयक्यूएसी तसेच आयआयसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयसीआरईएसटी -२०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये एकूण  ९८ संशोधन पेपर सादर केले गेले.सदर परिषदेचे उद्घाटन गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. बेदात्री मौलिक (विद्युत विभाग, अमेटी युनिव्हर्सिटी नोएडा) होत्या. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. महेश एच पाटील (समन्वयक), डॉ. अतुल बर्‍हाटे (उपसमन्वयक) डॉ. तुषार कोळी (अधिष्ठाता), डॉ. हेमंत इंगळे (अधिष्ठाता, रिसर्च अँड डेव्हलपमेंट ) तसेच सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग आणि सहभागी संशोधक उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले. आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.