Contact Banner

जळगाव : घरपोच गॅस सिलिंडरच बंधनकारक; नियम मोडल्यास कडक कारवाई

 

jalgaon-gharpoch-gas-cylinder-bandhanakarak-niyam-modlyas-kadak-karvai

जळगाव : घरपोच गॅस सिलिंडरच बंधनकारक; नियम मोडल्यास कडक कारवाई

जळगाव, दि. ५ एप्रिल — जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण आता केवळ घरपोच (होम डिलिव्हरी) पद्धतीनेच करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कार्यालय किंवा गोडाऊनमधून थेट सिलिंडर देण्यास जिल्हा प्रशासनाने स्पष्ट बंदी घातली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एजन्सींवर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्हा पुरवठा विभागाने , आणि या कंपन्यांच्या सेल्स अधिकाऱ्यांना याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत. गॅस वितरणात पारदर्शकता राखणे, ग्राहकांची गैरसोय टाळणे आणि कोणत्याही प्रकारचा तुटवडा भासू न देणे, यावर विशेष भर देण्यात आला आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार, काही एजन्सीकडून गोडाऊन किंवा कार्यालयातून थेट सिलिंडर देण्याची पद्धत सुरू असल्याने ग्राहकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत होत्या. तसेच, या प्रकारामुळे काळाबाजार आणि गैरव्यवहाराला वाव मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व वितरण होम डिलिव्हरीद्वारेच करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना मोरे यांनी सांगितले की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एजन्सींची तपासणी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच, ग्राहकांनीही एजन्सीकडून थेट सिलिंडर घेण्याऐवजी घरपोच सेवा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तक्रारींसाठी हेल्पलाईन
गॅस वितरणात कोणतीही अनियमितता, काळाबाजार किंवा अडचण आढळल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या हेल्पलाईन क्रमांकावर (0257-2223180) तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे ग्राहकांना आता रांगेत उभे राहण्याची गरज कमी होणार असून, गॅस घरपोच मिळण्याचा मार्ग अधिक सुलभ झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.