मृत्यूचा काळा दिवस! खंडव्याजवळ अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार
मृत्यूचा काळा दिवस! खंडव्याजवळ अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार
भुसावळ, दि. 18 (प्रतिनिधी):
मध्य प्रदेशातील खंडव्याजवळ शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण कार अपघातात वरणगाव येथील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये श्याम विक्रम ठाकूर (वय 45), शोभा विक्रम ठाकूर (वय ६५) आणि शिवन्या श्याम ठाकूर (वय 5) यांचा समावेश आहे. तसेच, या अपघातात अन्य चार जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
सदर कुटुंब उज्जैन व ओंकारेश्वर येथे दर्शन करून सिहोर येथून परत येत असताना हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारचा भीषण अपघात झाला, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघातात श्याम ठाकूर यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या शोभा ठाकूर आणि लहानगी शिवन्या यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेमुळे वरणगाव फॅक्टरी परिसरात हळहळ व्यक्त होत असून ठाकूर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत