सावदा येथील माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा ताराबाई वानखेडे यांचे निधन
सावदा येथील माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा ताराबाई वानखेडे यांचे निधन
सावदा (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : सावदा येथील लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा ताराबाई गजाननराव वानखेडे (वय ७८) यांचे आज दिनांक ६ रोजी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सावदा शहरात शोककळा पसरली असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
ताराबाई वानखेडे यांनी नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात शहराच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले होते. त्यांच्या साध्या, संयमी व लोकाभिमुख स्वभावामुळे त्या नागरिकांमध्ये लोकप्रिय होत्या.
त्यांच्या पश्चात मुले हभप शेखर वानखेडे, राजेश वानखेडे (माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक, नगर परिषद सावदा), चारुदत्त वानखेडे, सुना,नातवंडे असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा मंगळवार, दिनांक ०७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता संभाजी चौक, सावदा येथील राहत्या घरून निघणार आहे.
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत