Contact Banner

सावदा येथे हनुमान जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक; विविध आकर्षणांनी रंगणार उत्सव

 

savda-yethe-hanuman-jayanti-nimit-bhavya-mirvanuk-vividh-akrashanani-ranganar-utsav


सावदा येथे हनुमान जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक; विविध आकर्षणांनी रंगणार उत्सव

सावदा (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : सकल हिंदू समाजातर्फे सावदा शहरात हनुमान जयंतीनिमित्त गुरुवार रोजी संध्याकाळी ५  वाजता क्रांती चौक येथून भव्य आणि आकर्षक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून, यंदा हा उत्सव अधिक उत्साहात साजरा होणार आहे. मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार असून, शहरात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

ही मिरवणूक शहरातील क्रांती चौक,पाटील पुरा,इंदिरा गांधी चौक, धर्मवीर संभाजी महाराज चौक, गांधी चौक,, गवत बाजार मार्गे रविवार पेठ ,छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे वंजारवाडी ,दादा गल्ली ,कॉर्नर रोड ,सुभाष चौक मार्गे क्रांती चौक या प्रमुख मार्गांवरून विविध धार्मिक देखाव्यांसह काढण्यात येणार आहे. पारंपरिक वेशभूषेत कलाकारांचा सहभाग मिरवणुकीला वेगळे आकर्षण देणार आहे. 

मिरवणुकीतील प्रमुख आकर्षणांमध्ये शिवफुले मर्दानी आखाडा, रावेर यांचे थरारक प्रात्यक्षिक आणि भवानी वहन सांगवी  यांचा समावेश आहे. या सादरीकरणांमुळे मिरवणुकीत पारंपरिक कला आणि शौर्याची झलक पाहायला मिळणार आहे. याशिवाय, जळगाव येथील रॉक नाईन बँड यांच्या वतीने भक्तिमय वाद्यसंगीत सादर केले जाणार असून, संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.

हनुमान जन्मोत्सव समिती, सावदा शहरचे अध्यक्ष साहिल चौधरी, उपाध्यक्ष गौरव चौधरी, सचिव जयेश वाघुळदे तसेच कौशल धांडे यांनी सर्व भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मिरवणुकीत सहभागी व्हावे आणि उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.

या भव्य मिरवणुकीच्या निमित्ताने सावदा शहरात धार्मिक एकात्मता, उत्साह आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.