Contact Banner

शिवराज्याभिषेक दिन काव्य स्पर्धा – २०२६ -७ जून रोजी मुंबईत अंतिम फेरी व पारितोषिक वितरण

 

shivrajyabhishek-din-kavya-spardha-2026-7-june-mumbai-antim-pher-paritoshik-vitaran


शिवराज्याभिषेक दिन काव्य स्पर्धा – २०२६ -७ जून रोजी मुंबईत अंतिम फेरी व पारितोषिक वितरण


मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ६ जून १६७४ रोजी रायगडावर झालेल्या राज्याभिषेकाच्या ऐतिहासिक स्मृतींना शब्दरूप देण्यासाठी "श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल" आणि "मराठी साहित्य व कला सेवा" यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक दिन काव्य स्पर्धा – २०२६ आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धा सर्व वयोगटातील मराठी कवींकरिता खुली असून, सहभागी कवितांनी छत्रपती शिवाजी महाराज, शिवराज्याभिषेक, हिंदवी स्वराज्य आणि शिवविचार या विषयांवर आधारित असणे आवश्यक आहे. प्रत्येक कवींनी स्वतःची स्वरचित, पूर्वी प्रकाशित न झालेली व साहित्यचौर्यरहित एकच कविता पाठवावी. कविता १६ ते ४० ओळींच्या मर्यादेत आणि वर्ड/पीडीएफ स्वरूपात ई-मेलद्वारे पाठवावी. गझल, हस्तलिखित किंवा छायाचित्र स्वरूपातील कविता स्वीकारल्या जाणार नाहीत.

कविता पाठविण्याची अंतिम तारीख १५ मे २०२६, रात्री १२:०० आहे. अंतिम फेरीसाठी २० कवींची निवड २१ मे २०२६ रोजी व्हॉट्सअ‍ॅप स्पर्धा समूहावर जाहीर केली जाईल. अंतिम फेरी ७ जून २०२६ रोजी तज्ज्ञ परीक्षकांच्या उपस्थितीत होईल. प्रत्येक कवीला सादरीकरणासाठी कमाल ४ मिनिटांचा वेळ दिला जाईल.

प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासह दोन उत्तेजनार्थ कविता रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान केले जाईल. पारितोषिक स्वीकारण्यासाठी कवींनी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम आणि सर्वांसाठी बंधनकारक असेल.

अधिक माहितीसाठी संपर्क: गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मोबाईल: ९९८७७४६७७६, ई-मेल: marathisahityavkalaseva@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.