Contact Banner

स्वामी विवेकानंदांचे विचार तरुणांना प्रेरणादायी; समाजासाठी दिशादर्शक – कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत

 

swami-vivekananda-vichar-yuva-prerna-rajendra-rajput-faizpur-camp

स्वामी विवेकानंदांचे विचार तरुणांना प्रेरणादायी; समाजासाठी दिशादर्शक – कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत

लेवाजगत न्यूज फैजपूर : तरुणांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक सक्षमता अत्यावश्यक असून यांच्या विचारांमधून प्रेरणा घेणे आजच्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी केले.

ते फैजपूर येथील सौ. कुसुमताई मधुकरराव चौधरी माध्यमिक विद्यालयात , कन्याकुमारी यांच्या वतीने आयोजित तीन दिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पूजन, माल्यार्पण आणि दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंचावर संचालिका सौ. हिमा सुधाकर चौधरी, उपमुख्याध्यापक श्री. ललित जयराम बोंडे, शिक्षक श्री. अनिल अंबादास उबाळे, पालक सौ. वर्षा खेमचंद्र भिरुड, सौ. हरसीला चंद्रशेखर कोल्हे यांच्यासह माता-भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिराचे प्रास्ताविक प्रशिक्षक सूरज यांनी केले. त्यांनी व्यक्तिमत्व विकास शिबिराच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि समृद्ध समाजनिर्मितीत तरुणांची भूमिका यावर प्रकाश टाकला.

यानंतर कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग कथन करत विद्यार्थ्यांना निडर, आत्मविश्वासू, आज्ञाधारक आणि सुसंस्कारी बनण्याचे आवाहन केले. मातृ, पितृ, गुरु, समाज, देश, देव आणि धर्म यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी स्वबल, आत्मनिर्भरता आणि श्रमप्रतिष्ठा या मूल्यांचा अंगीकार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिबिराचा उद्देश यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.