चिरनेर - कळंबूसरे रस्त्यावर जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया
चिरनेर - कळंबूसरे रस्त्यावर जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया
उरण : सुनिल ठाकूर -उरण तालुक्यातील चिरनेर हायस्कूल नाक्याजवळ,चिरनेर - कळंबूसरे रस्त्यावर पुलाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी काल सकाळी 6:45 वाजताचे सुमारास बांधपाडा - खोपटे ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने दोन तासात भर रस्त्यावर मोठया प्रमाणात पाण्याच्या प्रेशरणे कारंजा उडत राहिल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.कडक उन्हाळ्याच्या दिवसात कित्येक ठिकाणी पाण्याची वणवण सुरु असतांना या हेटवणे पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीतून चिरनेर हायवे रोड येथून जोडलेली बांधपाडा - खोपटे गावाकडे पाणी पुरवठा करण्यासाठी साकरण्यात आलेली जलवाहिनी सकाळच्या सत्रात फुटल्याने खोपटे येथील रहिवाशांची उन्हाच्या तडाक्यातच पाण्याची पुरती गैरसोय झाली होती.
फुटलेल्या जलवहिनीतून दोन तास स्वछ आणि निर्मळ असे पिण्याचे पाणी वाया जात असतांना रस्त्यावरील पादचारी आणि वाहनचालकांनी हे दृश्य समोर पाहत होते. परंतु पाण्याची विनाकारण होणारी नासाडी थांबविण्यासाठी येथील नागरिकांनी सहकार्य करून संबंधितांना कळवून वाया जाणारे पाणी बंद करून थांबविण्यात आले.मात्र सदरची जलवाहिनी बंद करून फुटलेली जलवाहिनी बांधपाडा ग्रामपंचायतीच्या वतीने प्लंबर आणि कामगारांनी युद्ध पातळीवर दुरुस्ती करून जोडण्यात आली.याशिवाय बंद करण्यात आलेला पाणी पुरवठाही सुरळीत करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सातंगे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत