Contact Banner

धर्मसंस्कार शिबिरातून घडत आहेत सुदृढ व सुजाण नागरिक : श्री कृष्णराज बाबा पाचराऊत

 

healthy-and-aware-citizens-shri-krishnaraj-baba-pacharaut


धर्मसंस्कार शिबिरातून घडत आहेत सुदृढ व सुजाण नागरिक : श्री कृष्णराज बाबा पाचराऊत

लेवाजगत न्यूज फैजपूर : यांच्या वतीने आयोजित धर्मसंस्कार शिबिरात सर्वार्थाने सक्षम, सुदृढ व सुजाण नागरिक घडविण्यासाठी शास्त्र आणि शस्त्र पारंगत संत-महात्मे व शिक्षकांचे मौल्यवान मार्गदर्शन लाभले. स्वसंरक्षण, ध्यान, प्राणायाम, योगासने तसेच विविध खेळ व स्पर्धांमधून हे शिबिर व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी साधन बनले असून अशी शिबिरे आयोजित करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन यांनी केले.

ते फैजपूर येथे श्रीकृष्ण महानुभाव मंदिराच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी आयोजित धर्मसंस्कार शिबिराच्या समारोप व बक्षीस वितरण समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर , , , , यांच्यासह सहभागी बालक-बालिका व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहिंसा व सामाजिक एकतेचा संदेश देणारा सर्वज्ञ यांच्या प्रेरणेतून सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात सतत कार्यरत असतो. समाजातील ढासळती नैतिक मूल्ये, मोबाईलचा वाढता अतिरेक, पालकांचा अनादर तसेच शिक्षण, समाज आणि पर्यावरणाबद्दल वाढती अनास्था या पार्श्वभूमीवर मंदिराचे गादीपती यांच्या मार्गदर्शनाखाली १५ मेपासून धर्मसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिरात सहभागी बालक-बालिकांना गीतापठण, मंत्र, श्लोक मनन व कंठस्थ करण्यासाठी विशेष सत्रे घेण्यात आली. संत-महात्म्यांचे मार्गदर्शन, विविध स्पर्धा, खेळ, वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान यांच्या माध्यमातून सुजाण नागरिक घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

शिबिराचे प्रास्ताविक यांनी केले. त्यांनी शिबिरातील विद्यार्थ्यांमध्ये झालेला सकारात्मक बदल अधोरेखित करत शिबिराचा उद्देश यशस्वी झाल्याचे सांगितले. तसेच ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष एस. व्ही. चौधरी यांनी अशी शिबिरे सातत्याने आयोजित व्हावीत, यासाठी मंडळाकडून सदैव सहकार्य राहील असे आश्वासन दिले.

यावेळी आयोजक राजधर बाबा पुजदेकर यांनी शिबिरातील मुलांचे मजेदार अनुभव सांगताना, “शिबिर संपूच नये,” अशी भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्याचे सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक वृक्ष लावण्याचा संकल्प करत वृक्षारोपण सत्रात उत्साहाने सहभाग घेतल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच स्वच्छतेचे संस्कार घर आणि शाळेतही पाळण्याचे आश्वासन मुलांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

समारोप प्रसंगी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. चित्रकला, निबंध, लिंबू-चमचा, बेडूक उड्या, वक्तृत्व अशा विविध स्पर्धांतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचाही गौरव करण्यात आला.

यावेळी सहभागी बालक-बालिकांनी मनोगत व्यक्त करत शिबिरातील प्रत्येक सत्राने आम्हाला संस्कार व जीवनमूल्ये दिली असून ती आयुष्यभर जपणार असल्याचे सांगितले. पुढील धर्मसंस्कार शिबिराची आतुरतेने वाट पाहत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी केले तर आभार प्रदर्शन राजधर बाबा पुजदेकर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.