प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध
लेवाजगत न्यूज जळगाव, दि. 05 -: केंद्र शासनाच्या कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालय मार्फत देशभरातील तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव मिळावा यासाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या तिसऱ्या फेरीत जळगाव जिल्ह्यात एकूण ३२ इंटर्नशिप संधी उपलब्ध झाल्या असून, जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना ६ ते ९ महिन्यांच्या कालावधीसाठी इंटर्नशिप दिली जाणार असून, दरमहा ९,००० रुपये इतके विद्यावेतन देण्यात येणार आहे. तसेच रुजू झाल्यानंतर ६,००० रुपये प्रोत्साहनपर अनुदानही दिले जाणार आहे.
जळगाव जिल्ह्यात विविध क्षेत्रांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध आहेत. विप्रो इंटेरप्रायझेस येथे सुरक्षा (safety) क्षेत्रासाठी १२ वी उत्तीर्ण असलेल्या एकूण ०१ जागा, अभियांत्रिकी (Engineering) क्षेत्रासाठी IT। उत्तीर्ण असलेल्या एकूण ०५ जागा, प्रोडक्शन (Production) क्षेत्रासाठी १२ वी उत्तीर्ण असलेल्या एकूण १५ जागा, एच. आर. (HR - Human Resources) क्षेत्रासाठी पदवीधर उत्तीर्ण असलेल्या एकूण ०१ जागा, तसेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे 'सेल्स अँड मार्केटिंग' क्षेत्रासाठी १० वी उत्तीर्ण पात्रता असलेल्या एकूण ९ जागा भरल्या जातील, तर अशोका बिल्डकॉन लिमिटेड येथे 'ह्युमन रिसोर्स' (HR) पदासाठी पदवीधर उमेदवाराची १ जागा आहे.
या योजनेमुळे तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळण्यासोबतच आर्थिक लाभही होणार असल्याने ही एक महत्त्वाची संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव (दूरध्वनी क्र. ०२५७-२९५९७९०) येथे संपर्क साधावा किंवा शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी. एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे प्रत्यक्ष भेट द्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त संदीप गायकवाड यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत