Contact Banner

आषाढी एकादशीनिमित्त मध्य रेल्वेकडून पंढरपूरसाठी विशेष गाड्या

आषाढी एकादशीनिमित्त मध्य रेल्वेकडून पंढरपूरसाठी विशेष गाड्या


आषाढी एकादशीनिमित्त मध्य रेल्वेकडून पंढरपूरसाठी विशेष गाड्या

मुंबई : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नवी अमरावती–पंढरपूर मार्गावर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे भाविकांना प्रवासासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

नवी अमरावती–पंढरपूर विशेष (4 फेऱ्या):

  • गाडी क्र. 01119 दिनांक 21 जुलै 202624 जुलै 2026 रोजी नवी अमरावती येथून दुपारी 2.40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9.10 वाजता पंढरपूर येथे पोहोचेल.
  • गाडी क्र. 01120 दिनांक 22 जुलै 202625 जुलै 2026 रोजी पंढरपूर येथून सायंकाळी 7.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12.50 वाजता नवी अमरावती येथे पोहोचेल.

मध्य रेल्वेने प्रवाशांना तिकीट आरक्षणासाठी RailOne अॅपचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक आणि थांब्यांची माहिती जाणून घेण्यासाठी NTES अॅप किंवा करण्यात आले आहे.





आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी व भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने नवी अमरावती–पंढरपूर–नवी अमरावती विशेष गाडी (क्र. 01119/01120) चालविण्याची घोषणा केली आहे. या विशेष गाडीच्या एकूण चार फेऱ्या होणार असून, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, जळगाव, पाचोरा तसेच चाळीसगाव स्थानकांवरही या गाडीला थांबा देण्यात आला आहे.

गाडी क्र. 01119 ही विशेष गाडी 21 व 24 जुलै 2026 रोजी नवी अमरावती येथून दुपारी 2.40 वाजता सुटेल. ती भुसावळ (7.10 वा.), जळगाव (7.40 वा.), पाचोरा (8.15 वा.) आणि चाळीसगाव (9.07 वा.) मार्गे प्रवास करून दुसऱ्या दिवशी सकाळी 9.10 वाजता पंढरपूर येथे पोहोचेल.

तर गाडी क्र. 01120 ही विशेष गाडी 22 व 25 जुलै 2026 रोजी पंढरपूर येथून सायंकाळी 7.30 वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी चाळीसगाव (पहाटे 4.57 वा.), पाचोरा (5.37 वा.), जळगाव (7.02 वा.) आणि भुसावळ (7.25 वा.) मार्गे प्रवास करून दुपारी 12.50 वाजता नवी अमरावती येथे पोहोचेल.

या विशेष गाडीमुळे खान्देशातील वारकरी आणि भाविकांना आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणे अधिक सोयीचे होणार आहे. प्रवाशांनी तिकीट आरक्षणासाठी RailOne अॅपचा वापर करावा तसेच सविस्तर वेळापत्रक आणि इतर माहितीसाठी NTES अॅप किंवा भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.