Contact Banner

गणेश फड आज रात्री सावदा पोलीस ठाण्याचा पदभार घेणार

 

ganesh-phad-to-take-charge-of-savda-police-station-tonight


गणेश फड आज रात्री सावदा पोलीस ठाण्याचा पदभार घेणार

लेवाजगत न्यूज सावदा : राज्य पोलीस विभागातील बदली प्रक्रियेनुसार सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनी) विशाल पाटील यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले सपोनी गणेश फड आज रात्री पदभार स्वीकारणार आहेत.






सपोनी विशाल पाटील यांनी सावदा पोलीस ठाण्यात कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले. त्यांच्या कार्यकाळात सामाजिक जनजागृती मोहिमा, गुन्हे प्रतिबंधक उपक्रम तसेच स्थानिक पातळीवरील शांतता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आले. त्यांच्या कार्यशैलीचे नागरिकांसह विविध स्तरांतून कौतुक करण्यात आले होते.

दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेतील तपासाचा अनुभव असलेले सपोनी गणेश फड आता सावदा पोलीस ठाण्याची धुरा सांभाळणार आहेत. आर्थिक गुन्ह्यांच्या तपासातील त्यांच्या अनुभवाचा लाभ स्थानिक पोलीस प्रशासनाला होणार असून, पोलीस यंत्रणा अधिक सक्षम व गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या बदल्यांमुळे सावदा पोलीस विभागात प्रशासकीय स्तरावर महत्त्वपूर्ण फेरबदल झाले असून नव्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सावदा पोलीस ठाण्याच्या कामकाजाला नव्या दिशा व गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.