खिरोदा येथे २ जुलै रोजी काँग्रेसची SIR प्रशिक्षण कार्यशाळा; पदाधिकारी व BLA यांना उपस्थितीचे आवाहन
खिरोदा येथे २ जुलै रोजी काँग्रेसची SIR प्रशिक्षण कार्यशाळा; पदाधिकारी व BLA यांना उपस्थितीचे आवाहन
यावल (प्रतिनिधी): महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या Special Intensive Revision (SIR) अर्थात विशेष सघन मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जळगाव पूर्व जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे पक्षाचे पदाधिकारी आणि बूथ लेव्हल एजंट (BLA) यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत मतदार पुनर्नोंदणी, पात्र मतदारांची नावे मतदार यादीत कायम राहतील यासाठी आवश्यक कार्यपद्धती, तसेच SIR प्रक्रियेदरम्यान प्रभावीपणे काम करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
ही प्रशिक्षण कार्यशाळा गुरुवार, दि. २ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता खिरोदा येथील नाट्यगृह हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
जळगाव पूर्व जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष धनंजय शिरीष चौधरी यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकारी व बूथ लेव्हल एजंट यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व BLA यांना सोबत घेऊन या प्रशिक्षण कार्यशाळेस अनिवार्यपणे उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत