Contact Banner

गुरुपौर्णिमेनिमित्त सुनेसावखेडा येथे 29 जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

 


गुरुपौर्णिमेनिमित्त सुनेसावखेडा येथे 29 जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

सुनेसावखेडा (ता. यावल) | प्रतिनिधी

गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने समाजसेवेचा संदेश देत कष्टभंजन हनुमान मंदिर, सुनेसावखेडा येथे बुधवार, 29 जुलै 2026 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी 8.00 ते दुपारी 2.00 या वेळेत पार पडणार असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

"रक्तदान हेच श्रेष्ठ दान" या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे रक्तदान शिबिर कष्टभंजन हनुमान मंदिर, सुनेसावखेडा, बामणोद, ता. यावल, जि. जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.




संपर्क :

  • श्री. जयप्रकाश स्वामी – 8799182724

  • श्री. जयनारायण स्वामी – 9510804130

गुरुसेवा आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान करून शिबिर यशस्वी करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.