Contact Banner

डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

 

biquest-2026-biochemistry-quiz-competition-held-at-dr-ulhas-patil-medical-college-jalgaon

डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

जळगाव : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय (DUPMC), जळगाव येथील जैवरसायनशास्त्र विभागातर्फे प्रथम एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी ‘बायोक्वेस्ट २०२६’ या बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव यांच्या सहकार्याने पार पडली.






उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जैवरसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश जांभुळकर उपस्थित होते. यावेळी विभागप्रमुख डॉ. निलिमा पाटील यांच्यासह डॉ. रणधीर कुमार पांडे, डॉ. दिप्ती कात्रे, डॉ. योगेश तायडे, डॉ. प्रकाश तिरुवा, डॉ. सुनील तेटांबे, डॉ. राशिका सक्सेना, डॉ. आयुष महाजन, डॉ. बापूराव बीटे, डॉ. पल्लवी बढे, डॉ. युवराज बढे आणि डॉ. ऋतुजा एस. बिर्हाडे उपस्थित होते.


हे बघा -लेवाजगत epaper -https://lewajagat.epaper99.com//?url=home&ced=1&date=01/08/2026

मार्गदर्शन करताना डॉ. प्रशांत सोळंके यांनी स्पर्धेची अभिनव संकल्पना अधोरेखित केली. प्रत्येक संघामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रत्येकी एक विद्यार्थी सहभागी करण्यात आल्याने निष्पक्षता, समन्वय आणि टीमवर्कला प्रोत्साहन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे विषयज्ञान, संवादकौशल्य आणि व्यावसायिक सहकार्य अधिक सक्षम होते, असेही त्यांनी नमूद केले.

प्रमुख पाहुणे डॉ. राजेश जांभुळकर यांनी वैद्यकीय शिक्षणात बायोकेमिस्ट्री विषयाचे महत्त्व स्पष्ट करत अशा शैक्षणिक स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते, असे सांगितले.

स्पर्धेत चार संघांतील एकूण आठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध प्रश्नोत्तरांच्या फेऱ्यांमधून विद्यार्थ्यांनी बायोकेमिस्ट्री विषयावरील सखोल ज्ञान आणि तर्कशक्तीचे प्रभावी प्रदर्शन केले.

स्पर्धेचे आयोजन जैवरसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. निलिमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आयोजन समितीत डॉ. रणधीर कुमार पांडे, डॉ. दिप्ती कात्रे, डॉ. योगेश तायडे, डॉ. प्रकाश तिरुवा, डॉ. सुनील तेटांबे, डॉ. राशिका सक्सेना आणि डॉ. आयुष महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले.

स्पर्धेचा निकाल

  • 🥇 प्रथम क्रमांक : टीम बी – आरुष गुप्तामधुरा युवराज बढे
  • 🥈 द्वितीय क्रमांक : टीम सी – अर्जुन रमेश मांडवेलक्ष्मी सुषमा देशमुख
  • 🥉 तृतीय क्रमांक : टीम डी – आद्या आहुजाशैलेश माणिक फेगडे
  • चतुर्थ क्रमांक : टीम ए – लक्षिता संजय जवांजळतनमय भैरवनाथ देशमुख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.