लोकनेते, माजी मंत्री, आमदार एकनाथराव खडसे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सावदा येथे सर्वपक्षीय बैठक
लोकनेते, माजी मंत्री, आमदार एकनाथराव खडसे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सावदा येथे सर्वपक्षीय बैठक
लेवाजगत न्यूज सावदा : लोकनेते, माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त दि. ३० ऑगस्ट रोजी कोथळी, मुक्ताईनगर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सावदा येथे सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रा. सुनील नेवे सर यांनी कोथळी येथे आयोजित करण्यात आलेल्या अमृतमहोत्सवी वाढदिवस कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा उपस्थितांना समजावून सांगितली.
एकनाथराव खडसे यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक वाटचालीत खान्देशासह राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
प्रा. सुनील नेवे यांनी उपस्थितांना भावनिक आवाहन करताना, प्रत्येकाने आपल्या मित्रमंडळींसह परिवारालाही सोबत घेऊन कोथळी येथे कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे सांगितले. हा कार्यक्रम केवळ एका व्यक्तीचा वाढदिवस नसून त्यांच्या दीर्घ सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव करणारा सोहळा असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, सावदा येथे झालेल्या या सर्वपक्षीय बैठकीत कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. दि. ३० ऑगस्ट रोजी कोथळी, मुक्ताईनगर येथे होणारा अमृतमहोत्सवी वाढदिवस सोहळा उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरा करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत