आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी २४ व २५ ऑगस्टला अर्जाची संधी
आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी २४ व २५ ऑगस्टला अर्जाची संधी
जळगाव, दि. २२ : प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव कार्यक्षेत्रातील परिवहनेतर संवर्गातील दुचाकी वाहनांसाठी एमएच-१९/ईवाय-०००१ ते ९९९९ ही नवीन नोंदणी मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या मालिकेतील आकर्षक अथवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी इच्छुक वाहनधारकांनी दि. २४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे अर्ज सादर करावेत.
अर्जासोबत विहित शासकीय शुल्काचा धनाकर्ष (DD), अर्जदाराचे नाव, पत्त्याचा पुरावा तसेच आधारकार्डशी संलग्न मोबाईल क्रमांक सादर करणे आवश्यक आहे.
एखाद्या पसंतीच्या क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास वाढीव शुल्काच्या प्रक्रियेद्वारे संबंधित क्रमांक देण्यात येईल. यासाठी वाढीव शुल्काचा धनाकर्ष (DD) दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत बंद लिफाफ्यात सादर करणे आवश्यक आहे.
आकर्षक व पसंतीचा वाहन नोंदणी क्रमांक मिळवू इच्छिणाऱ्या नागरिकांनी निर्धारित मुदतीत अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बुरुड यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे संपर्क साधावा.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत