किसान सहकारी दूध उत्पादक सोसायटीची ३७ वी वार्षिक सभा उत्साहात सभासदांना मिटिंग भत्ता म्हणून १ लिटर तुपाची बरणी; १२ टक्के लाभांश जाहीर
किसान सहकारी दूध उत्पादक सोसायटीची ३७ वी वार्षिक सभा उत्साहात
सभासदांना मिटिंग भत्ता म्हणून १ लिटर तुपाची बरणी; १२ टक्के लाभांश जाहीर
लेवाजगत न्यूज सावदा : किसान सहकारी दूध उत्पादक सोसायटी, सावदा यांची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी सावदा येथील विठ्ठल मंदिरात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. संस्थेचे चेअरमन अतुल रामदास नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस व्हाईस चेअरमन रमेश तोताराम येवले, संचालक मंडळातील सदस्य तसेच माजी नगराध्यक्ष तथा माजी संस्था संचालक राजेंद्र चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभेस संस्थेचे ३४३ सभासद उपस्थित होते. यावेळी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. दूध उत्पादक सभासदांच्या हिताचे विविध महत्त्वपूर्ण निर्णय सभेत घेण्यात आले.
सभासदांना मिटिंग भत्ता म्हणून १ लिटर तुपाची बरणी
वार्षिक सभेस उपस्थित प्रत्येक सभासदाला मिटिंग भत्ता म्हणून १ लिटर विकास म्हशीच्या तुपाची बरणी देण्यात आली. संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या या भत्त्यामुळे सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
म्हशीचे दूध सर्वाधिक पुरवठा करणाऱ्यांचा गौरव
सन २०२५-२६ मध्ये संस्थेला सर्वाधिक म्हशीचे दूध पुरवठा करणाऱ्या सभासदांचा संचालक व सभासदांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व रोख प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
म्हशीचे दूध पुरवठा करणाऱ्यांमध्ये श्री. प्रमोद बळीराम चौधरी यांनी २१ हजार ८६२ लिटर दूध पुरवठा करून प्रथम क्रमांक मिळविला. त्यांना १२०० रुपयांचे बक्षीस देण्यात आले. श्रीमती निलीमा संदीप राणे यांनी १८ हजार ५१३ लिटर दूध पुरवठा करून द्वितीय क्रमांक मिळविला असून त्यांना ११०० रुपये बक्षीस देण्यात आले.
श्री. घनःशाम रामदास पाटील यांनी ७ हजार ७११ लिटर, सौ. कविता किरण राणे यांनी ७ हजार ३१८ लिटर, तर श्री. चेतन घनःशाम पाटील यांनी ७ हजार २४२ लिटर म्हशीचे दूध संस्थेला पुरवठा केले.
गायीचे दूध पुरवठा करणाऱ्या सभासदांचाही सन्मान
गायीचे दूध सर्वाधिक पुरवठा करणाऱ्या सभासदांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला. श्रीमती निलीमा संदीप राणे यांनी तब्बल १० हजार ७२८ लिटर गायीचे दूध पुरवठा करून प्रथम क्रमांक मिळविला. त्यांना १२०० रुपये रोख बक्षीस देण्यात आले.
श्री. चैतन्य खुशाल नेमाडे यांनी ६ हजार ७४९ लिटर दूध पुरवठा करून द्वितीय क्रमांक मिळविला असून त्यांना ११०० रुपये बक्षीस देण्यात आले. श्री. डिगंबर भास्कर चौधरी यांनी ५ हजार २४१ लिटर दूध पुरवठा केला.
तसेच श्रीमती लक्ष्मीबाई पुरुषोत्तम किन यांनी ४ हजार ६४७ लिटर, तर सौ. अर्चना अतुल नेमाडे यांनी ४ हजार ५२९ लिटर गायीचे दूध संस्थेला पुरवठा केले. संबंधित दूध उत्पादकांचा शाल, पुष्पगुच्छ व रोख प्रोत्साहनपर बक्षिसांनी गौरव करण्यात आला.
सभासदांना १२ टक्के लाभांश
सभेत सभासदांसाठी १२ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा लाभ सभासदांना मिळावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला.
म्हशीच्या दुधाला ४ रुपये, गायीच्या दुधाला २ रुपये २० पैसे भाव फरक
दूध उत्पादक सभासदांच्या हितासाठी सभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. म्हशीच्या दुधासाठी प्रतिलिटर ४ रुपये, तर गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर २ रुपये २० पैसे अतिरिक्त भाव फरक देण्यास मंजुरी देण्यात आली. यासोबतच बोनस वाटपासही मान्यता देण्यात आली.
पोळ्यापूर्वी ८५ लाख रुपये खात्यावर जमा होणार
पोळा सणापूर्वी सभासदांच्या बँक खात्यावर भाव फरक व बोनसाची एकूण ८५ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे संचालक मंडळाने जाहीर केले. या निर्णयामुळे दूध उत्पादक सभासदांना सणाच्या पार्श्वभूमीवर मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे.
संचालक मंडळाची उपस्थिती
सभेस चेअरमन नेमाडे अतुल रामदास, व्हाईस चेअरमन येवले रमेश तोताराम, संचालक भंगाळे घनःशाम ओंकार, अच्युत निलेश दिनकर, चौधरी महेश दिनकर, चौधरी लतेश रविंद्र, चौधरी भोजराज मधुकर, चौधरी भुषण प्रमोद, जावळे विनोद प्रभाकर, इंगळे रमेश दुला, पाटील स्वप्नील सुनिल, सरोदे अक्षय सुभाष, बैरागी धरमदास नारायण, तसेच संचालिका नेमाडे अर्चना अतुल, चौधरी निलीमा चंद्रकांत व राणे निलीमा संदीप उपस्थित होत्या.
माजी नगराध्यक्ष तथा संस्था संचालक राजेंद्र चौधरी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या माध्यमातून दूध उत्पादक सभासदांना अधिकाधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
३७ व्या वार्षिक सभेस ३४३ सभासदांची उपस्थिती होती. लाभांश, अतिरिक्त दूध भाव फरक, बोनस तसेच दूध उत्पादकांचा करण्यात आलेला गौरव यामुळे सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत