Contact Banner

श्री क्षेत्र लेण्याद्री येथे संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी गिरिजात्मज गणपतीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची उपस्थिती; मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप

 

lenyadri-girijatmaj-ganpati-sankashti-chaturthi-devotees-crowd-2026

श्री क्षेत्र लेण्याद्री येथे संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी

गिरिजात्मज गणपतीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची उपस्थिती; मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप

उरण : सुनील ठाकूर-

सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील श्री गिरिजात्मज गणपतीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली. संकष्टी चतुर्थी आणि श्रावणी सोमवार असा दुहेरी योग आल्याने भाविक तसेच पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. त्यामुळे संपूर्ण लेण्याद्री परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.






संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री गिरिजात्मज गणपतीच्या मूर्तीला तसेच मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी ६.१५ वाजता देवस्थानचे विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापूजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले.

देवाच्या नैवेद्यासाठी मंचर येथील बाळासाहेब बापू थोरात यांनी ३ कॅरेट केळी प्रसाद म्हणून अर्पण केली. मंदिरात सकाळी ७ वाजता, दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता महाआरती करण्यात आली. दिवसभर देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक विधी पार पडले.

भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने गर्दीचे नियोजन करण्यात आले होते. भाविकांसाठी विविध सोयी-सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष ॲड. संजय ढेकणे, उपाध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार भगवान हांडे, विश्वस्त मच्छिंद्र शेटे, सदाशिव ताम्हाणे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, कार्यालयीन सचिव रोहीदास बिडवई, व्यवस्थापक निलेश सरजिने, कर्मचारी, ग्रामस्थ तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सायंकाळी श्री मुक्ताई प्रासादिक भजनी मंडळ, शिवेचीवाडी यांच्या वतीने संगीत भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली. त्यानंतर गोळेगाव येथील जय महाराष्ट्र ग्रुप आणि राजगुरुनगर येथील संकेत बजरंग मुंढे यांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

संकष्टी चतुर्थीनिमित्त पुणे, अहमदनगर, मुंबई, ठाणे, नाशिक तसेच जुन्नर परिसरातून मोठ्या संख्येने भाविक लेण्याद्री येथे दर्शनासाठी दाखल झाले होते. दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही श्री गिरिजात्मज गणपतीचे दर्शन घेतले.

याबाबतची माहिती देवस्थानचे अध्यक्ष ॲड. संजय ढेकणे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.