Contact Banner

अमळनेरमध्ये श्रावणीय कानबाई माता उत्सवाला प्रारंभ; तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

 

shravaniya-kanbai-mata-utsav-amalner-2026

अमळनेरमध्ये श्रावणीय कानबाई माता उत्सवाला प्रारंभ; तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

अमळनेर : चोपडा नाका, शनिपेठ, अमळनेर येथे श्रावणीय कानबाई माता उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २२ ऑगस्ट ते सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम, पूजन, महाआरती, जागरण तसेच भव्य विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्सवाच्या पहिल्या दिवशी शनिवार, दि. २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.०५ वाजता रोट पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी भाजी-भाकर, रास पूजन, गहू दळणे तसेच मातेचा माल रांधण्याचा धार्मिक विधी पार पडणार आहे.

रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता कानबाई मातेचा अभिषेक करण्यात येणार असून, सायंकाळी ५ वाजता कानबाई माता स्थापना, नैवेद्य व रोट पूजन होईल. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता कानबाई मातेची महाआरती आणि जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत कानबाई मातेची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. या धार्मिक सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या उत्सवासाठी श्री. १००८ महामंडलेश्वर पार्वती आई परशुराम जोगी नंदगिरीजी, आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा उपाध्यक्ष, धुळे यांच्या उपस्थितीचे विशेष महत्त्व आहे.






श्रावणीय कानबाई माता महोत्सवाच्या निमित्ताने सर्व भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच कानबाई मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावा, असे नम्र आवाहन निमंत्रक श्री महंत हरीहरा पार्वती नंदगिरी दादू महाराज उर्फ दादू भगत, आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा, अमळनेर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

उत्सवाचे ठिकाण : चोपडा नाका, शनिपेठ, अमळनेर
कालावधी : २२ ते २४ ऑगस्ट २०२६


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.