स्व. गोदावरी आई यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन
स्व. गोदावरी आई यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन
लेवाजगत न्युज जळगाव : गोदावरी फाउंडेशनच्या आधारस्तंभ स्व. गोदावरी आई यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील रुग्णालय व गोदावरी नर्सिंग महाविद्यालयासह विविध संस्थांमध्ये अभिवादनपर कार्यक्रम घेण्यात आले.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फेही स्व. गोदावरी आई पाटील यांना अभिवादन करण्यात आले. डॉ. केतकी पाटील सभागृहात झालेल्या कार्यक्रमास माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, हृदयविकार विभागाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील, डीन डॉ. प्रशांत सोळंके, संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात अभिवादन
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातील मेट्रन कार्यालयातर्फे स्व. गोदावरी आई यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, हृदयविकार विभागाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित, डॉ. विजय बाविस्कर, डॉ. सुभाष बडगुजर, सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी सादुलवाड, डॉ. युवराज बढे, प्रशासन अधिकारी आशिष भिरूड यांच्यासह डॉ. संकेत पाटील, मनीषा खरात, कीर्ती पाटील व मेट्रन विभागातील सहकारी उपस्थित होते.
फिजिओथेरपी महाविद्यालयात प्रतिमापूजन
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्येही स्व. गोदावरी आई यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास गोदावरी फाउंडेशनचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत सोळंके, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, डॉ. अमित जैस्वाल, प्रा. चित्रा म्रीधा, प्रशासकीय अधिकारी राहुल गिरी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्व. गोदावरी आई यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
याचप्रमाणे गोदावरी अभियांत्रिकी, गोदावरी आयएमआर, डॉ. वर्षा पाटील इन्स्टिट्यूट, विधी व विज्ञान तसेच फॅशन महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील कृषी, कृषी अभियांत्रिकी, अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालय, गोदावरी स्कूल, डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ व सावदा, डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथी महाविद्यालय, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय तसेच महादेव हॉस्पिटल, जळगाव येथेही स्व. गोदावरी आई यांना अभिवादन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत