Contact Banner

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘सुकून’मधून प्राध्यापकांना मानसिक ताजेपणाचा मंत्र ‘बियॉन्ड द क्लासरूम’ फॅकल्टी वेलनेस सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद

godavari-engineering-polytechnic-sukoon-beyond-the-classroom-faculty-wellness-session


गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘सुकून’मधून प्राध्यापकांना मानसिक ताजेपणाचा मंत्र

‘बियॉन्ड द क्लासरूम’ फॅकल्टी वेलनेस सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद

लेवाजगत न्यूज जळगाव : गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व पॉलिटेक्निकच्या बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज विभागातर्फे प्राध्यापकांच्या मानसिक आरोग्यासह सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी ‘सुकून – बियॉन्ड द क्लासरूम’ या विशेष फॅकल्टी वेलनेस कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रसिद्ध ‘माइंडफुल एज्युकेटर’ व बाल मानसशास्त्रज्ञ सौ. मानसी गगधनी यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. त्यांनी आत्मजागरूकता, मानसिक आरोग्य, विचारांचे व्यवस्थापन आणि दैनंदिन जीवनातील तणावावर प्रभावीपणे मात करण्याच्या विविध पद्धती समजावून सांगितल्या.

कार्यशाळेदरम्यान प्राध्यापकांसाठी ध्यानधारणा (मेडिटेशन) सत्र घेण्यात आले. सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे, मनःशांती टिकविणे आणि मानसिक ताजेपणा अनुभवण्यासाठी विविध कृती व उपक्रमही घेण्यात आले.

अध्यापनाच्या धकाधकीच्या दिनचर्येत स्वतःसाठी वेळ देणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव या सत्रातून करून देण्यात आली. प्राध्यापकांचे मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासोबतच त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी अशा वेलनेस उपक्रमांची गरज असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. रेश्मा अट्टारडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रम समन्वयक डॉ. सरोज भोळे, विभागप्रमुख डॉ. नितीन भोळे, अकॅडमिक डीन डॉ. तुषार कोळी तसेच प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.