Contact Banner

दिव्यांग मुलांसोबत मीनाक्षी झांबरे यांचा वाढदिवस उत्साहात

 

meenakshi-zambre-birthday-celebration-divyang-mulansobat-jalgaon

दिव्यांग मुलांसोबत मीनाक्षी झांबरे यांचा वाढदिवस उत्साहात

लेवाजगत न्यूज जळगाव : जि.प. प्राथमिक शाळा, लमांजन, ता. जि. जळगाव येथील उपक्रमशील शिक्षिका मीनाक्षी ज्ञानदेव झांबरे यांचा वाढदिवस शासकीय दिव्यांग बहुउद्देशीय संमिश्र केंद्र, सिंधी कॉलनी, जळगाव येथे दिव्यांग, मतिमंद, कर्णबधिर व मूकबधिर विद्यार्थ्यांसोबत उत्साहात साजरा करण्यात आला.

वाढदिवसानिमित्त केंद्रातील विद्यार्थ्यांना भरीत-भाकरी व बर्फीचे भोजन देण्यात आले. तसेच मीनाक्षी झांबरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना पेनचे वाटप केले. विद्यार्थ्यांनी मीनाक्षी मॅडम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून उपस्थितांचे मन आनंदाने भरून आले.

या प्रसंगी वेदांत एज्युकेशनचे संचालक पंकज नाले, प्राथमिक शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटील, समाधान पाटील, विनोद जानकीराम पाटील, तळवेल हायस्कूलच्या योगिता झांबरे, रुईखेडा हायस्कूलचे शिक्षक तसेच मन्यारखेडा येथील समाजसेवक जितेंद्र नामदेव पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मीनाक्षी झांबरे व त्यांचे पती किशोर पाटील हे आपल्या कुटुंबातील वाढदिवस सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी साजरे करण्यास प्राधान्य देतात. विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी उपयुक्त उपक्रम राबविण्याची त्यांची परंपरा यावेळीही कायम राहिली.

दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करून त्यांना आनंद देण्याच्या या उपक्रमाचे मित्रपरिवार, स्नेहीजन तसेच सामाजिक स्तरातून कौतुक होत असून, मीनाक्षी झांबरे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

#मीनाक्षीझांबरे #वाढदिवस #दिव्यांगविद्यार्थी #सामाजिकउपक्रम #शैक्षणिकउपक्रम #जळगाव #सामाजिकबांधिलकी #लेवाजगत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.