सावदा येथील अशोक कडू वाघूळदे यांचे हृदयविकाराने निधन
सावदा येथील अशोक कडू वाघूळदे यांचे हृदयविकाराने निधन
सावदा : लेवा जगत न्यूज-
सावदा शहरातील रविवार पेठ परिसरातील रहिवासी अशोक कडू वाघूळदे यांचे रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ५.३० वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने वाघूळदे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अशोक कडू वाघूळदे हे किशन अशोक वाघूळदे यांचे वडील, तर माजी नगरसेविका चारुलता अशोक वाघूळदे यांचे पती होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातू-नातवंडे आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांनी दुःख व्यक्त केले.
लेवा जगत न्यूज, सावदा


कोणत्याही टिप्पण्या नाहीत