Contact Banner

तापी परिसर विद्या मंडळाच्या अध्यक्षपदी माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांची बिनविरोध निवड सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी नेतृत्वाची धुरा; शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

 

तापी परिसर विद्या मंडळाच्या अध्यक्षपदी माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांची बिनविरोध निवड सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी नेतृत्वाची धुरा; शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

तापी परिसर विद्या मंडळाच्या अध्यक्षपदी माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांची बिनविरोध निवड

सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी नेतृत्वाची धुरा; शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

फैजपूर लेवाजगत न्यूज प्रतिनिधी.

तापी परिसर विद्या मंडळाच्या अध्यक्षपदी माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांची बिनविरोध निवड सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी नेतृत्वाची धुरा; शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव


फैजपूर येथील अग्रगण्य शैक्षणिक संस्था तापी परिसर विद्या मंडळाच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी अध्यक्षपदी माजी आमदार शिरीषदादा मधुकरराव चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी त्यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवड निश्चित झाली. त्यांच्या निवडीमुळे शैक्षणिक क्षेत्रासह परिसरातील विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Lewajagat


तापी परिसर विद्या मंडळाने शैक्षणिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आता पुढील पाच वर्षांसाठी शिरीषदादा चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

संस्थेच्या आगामी वाटचालीत शैक्षणिक गुणवत्तावाढ, आधुनिक शैक्षणिक सुविधांचा विस्तार, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य आणि संस्थेच्या उज्ज्वल परंपरेचे जतन या बाबींना महत्त्व राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा मिळेल आणि तापी परिसर विद्या मंडळाच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शिरीषदादा चौधरी यांच्या बिनविरोध निवडीमुळे संस्थेच्या आगामी कार्यकाळाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या निवडीबद्दल शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक आणि परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत असून, पुढील कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.