Contact Banner

खिरोदा येथील ज्ञानेश बोंडे याचे विज्ञान प्रदर्शनात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक; मुख्यमंत्री विज्ञान वारीसाठी निवड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठीही निवड; विद्यार्थ्याच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव

 

dhanaji-nana-vidyalaya-khiroda-gyanesh-bonde-science-exhibition-first-rank

खिरोदा येथील ज्ञानेश बोंडे याचे विज्ञान प्रदर्शनात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक; मुख्यमंत्री विज्ञान वारीसाठी निवड

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठीही निवड; विद्यार्थ्याच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव


dhanaji-nana-vidyalaya-khiroda-gyanesh-bonde-science-exhibition-first-rank


लेवा जगत न्यूज खिरोदा (ता. रावेर) : धनाजी नाना विद्यालय, खिरोदा येथील इयत्ता दहावी ‘क’ वर्गातील विद्यार्थी कु. ज्ञानेश निळकंठ बोंडे याने रावेर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. उच्च माध्यमिक गट (इयत्ता ९ वी ते १२ वी) या गटातून त्याने प्रथम क्रमांक पटकावला असून, त्याची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.

ज्ञानेशच्या या यशात आणखी एक विशेष बाब म्हणजे त्याची मुख्यमंत्री विज्ञान वारीसाठीही निवड झाली आहे. या उपक्रमांतर्गत त्याला महाराष्ट्रातील किंवा भारतातील विज्ञान केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार असून, त्यासाठीचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र शासनामार्फत केला जाणार आहे. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून विज्ञान प्रकल्पावर काम करण्याची संधीही त्याला उपलब्ध होणार आहे.

ज्ञानेशला मार्गदर्शक शिक्षक श्री. डी. आर. फेगडे आणि श्री. डी. आर. साळवे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला असून, त्याच्या पुढील शैक्षणिक आणि वैज्ञानिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी संस्थेचे कुटुंबप्रमुख तथा माजी आमदार श्री. शिरीषदादा चौधरी, अध्यक्ष श्री. कुमारदादा चौधरी, सचिव श्री. अजितदादा पाटील, सहसचिव श्री. झोपे सर, मुख्याध्यापिका सौ. मनीषा महाजन आणि पर्यवेक्षक श्री. एस. आर. किरंगे यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

ज्ञानेशने मिळवलेल्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्याच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.