Contact Banner

डोंगर कठोरा येथे आरोग्य तपासणी शिबिर; ३० महिलांची तपासणी

 

dongar-kathora-women-health-checkup-camp-30-women-examined


डोंगर कठोरा येथे आरोग्य तपासणी शिबिर; ३० महिलांची तपासणी


डोंगर कठोरा प्रतिनिधी सुनील मेघे : डोंगर कठोरा गावामध्ये आरोग्य विभागाच्या वतीने महिलांसाठी आरोग्य तपासणी व जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि इतर आरोग्यविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

dongar-kathora-women-health-checkup-camp-30-women-examined


या उपक्रमात समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. धवल लक्ष्मण चौधरी आणि आरोग्य सेविका सौ. लता उगमकांत चौधरी यांच्यासह आशा वर्कर सौ. रोहिणी तायडे, सौ. जयश्री जंगले, श्रीमती सरोजा चौधरी आणि श्रीमती रेखा भिल्ल यांनी सहभाग घेतला.


शिबिरामध्ये सुमारे ३० महिलांची तपासणी करण्यात आली. महिलांना नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. आजारांचे लवकर निदान झाल्यास योग्य उपचार घेणे सोपे होते, त्यामुळे महिलांनी आरोग्याबाबत जागरूक राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढण्यास मदत झाली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.