Contact Banner

जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील स्कूलचे विद्यार्थी चमकले! वृदांत पाटील आणि मित नेमाडे यांना विजेतेपद; विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड

 

dr-ulhas-patil-school-savda-students-win-district-level-archery-competition

जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील स्कूलचे विद्यार्थी चमकले!

वृदांत पाटील आणि मित नेमाडे यांना विजेतेपद; विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड

लेवाजगत न्यूज सावदा : जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सावदा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विजेतेपद पटकावले. या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर शाळेच्या दोन्ही विद्यार्थ्यांची विभागस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

स्पर्धेतील १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या रिकर्व्ह राऊंडमध्ये शाळेचा विद्यार्थी वृदांत सचिन पाटील याने अचूक निशाणा साधत विजेतेपद मिळविले. तसेच १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या रिकर्व्ह प्रकारात मित मनोज नेमाडे याने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.

दोन्ही विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भारती महाजन यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि आगामी विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांचा नियमित सराव, मेहनत आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. क्रीडा शिक्षक असलम अली, वसीम शहा, प्रशांत सोनवणे, तुषार सैतवाल आणि रीमाशा मल्लिक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्गाने विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.

विभागस्तरीय स्पर्धेतही दोन्ही विद्यार्थी उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचा नावलौकिक वाढवतील, असा विश्वास शाळा प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.