फत्तेपूर येथे डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर होमिओपॅथिक औषधांचे मोफत वितरण; शासकीय आरोग्य योजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन
फत्तेपूर येथे डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
होमिओपॅथिक औषधांचे मोफत वितरण; शासकीय आरोग्य योजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन
फत्तेपूर, ता. जामनेर | प्रतिनिधी-
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासोबतच आरोग्यविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव यांच्या वतीने २८ ऑक्टोबर रोजी फत्तेपूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिराचे उद्घाटन भाजपचे ज्येष्ठ नेते जे. के. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. अरुण फिरके, बबलूशेठ भन्साळी, पंचायत समितीचे उपसभापती एकनाथ लोखंडे, उपसरपंच आत्माराम गावंडे, डॉ. सुराजसिंग पाटील, ग्रामपंचायत अधिकारी अमोल देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार होमिओपॅथिक औषधांचे मोफत वितरण करण्यात आले. याशिवाय आयुष्मान भारत योजना आणि इतर शासकीय आरोग्य योजनांबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. पात्र रुग्णांना शासकीय योजनांच्या माध्यमातून मोफत उपचार व शस्त्रक्रियांचा लाभ कसा घेता येईल, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना योग्य उपचारांची माहिती मिळावी, तसेच आर्थिक अडचणींमुळे कोणालाही उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, हा या आरोग्य शिबिरामागील प्रमुख उद्देश होता. वैद्यकीय पथकाने ग्रामस्थांना विविध आरोग्यविषयक बाबींवर मार्गदर्शन करून आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले.
या उपक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विद्यानंद आठवले, प्रा. डॉ. सचिन पाटील, डॉ. विनायक विलायते, डॉ. सरगम सिंग, डॉ. तुबा नाझ यांच्यासह इंटर्न्स आणि सह-इंटर्न्स यांनी सहभाग घेतला. वैद्यकीय पथकाच्या सहकार्याने शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
शिबिराच्या आयोजनासाठी सरपंच सौ. पल्लवी सतीश पाटील, दत्तात्रय वसंत पाटील, सौ. रंजना दत्तात्रय पाटील, लोटूबा वसंतराव पाटील, सतीश हरिदास पाटील आणि कृष्णा पाटील यांनी सहकार्य केले. तसेच राजीव तायडे, पुंडलिक पाटील, प्रेम टेलर, प्रह्लाद पाटील, अनिल आप्पा, अरुण कोळी आदींनी शिबिराच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे आणि ग्रामस्थांचे महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत