Contact Banner

बोरखार येथे जय भवानी नवरात्रोत्सवात अध्यात्म, शिक्षण आणि क्रीडा यांचा त्रिवेणी संगम

 

jay-bhavani-navratri-utsav-borkhar-cultural-sports-competitions

बोरखार येथे जय भवानी नवरात्रोत्सवात अध्यात्म, शिक्षण आणि क्रीडा यांचा त्रिवेणी संगम

चित्रकला व बालक्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद; तुळजाभवानी मातेच्या प्रतिकृतीची प्रतिष्ठापना

उरण : सुनील ठाकूर-




जय भवानी नवरात्रोत्सव मंडळ, बोरखार येथे यंदा १८ व्या वर्षानिमित्त विविध धार्मिक, शैक्षणिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. या उत्सवातून अध्यात्म, कला आणि क्रीडा यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. विविध कार्यक्रमांना भाविक, ग्रामस्थ आणि लहान मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


*हे पण बघा-सावदा शहरात लग्नसमारंभासाठी खास संधी! लग्नाची तारीख नसल्यास मंगल कार्यालय, मॅरेज हॉल व लॉन्स निम्म्या किमतीत!*
*कुलसुमबाई अख्तर हुसेन मंगल कार्यालय, जेहरा मॅरेज हॉल आणि जाफर लॉन्समध्ये विशेष सवलतीची सुविधा; लग्नकार्यासाठी लागणारे साहित्यही निम्म्या किमतीत उपलब्ध!*
*सम्पूर्ण माहिती बघा लेवाजगत युट्युब चॅनल  वर*
https://youtu.be/-V93ob9l9OY


उत्सवाच्या निमित्ताने नवी मुंबई येथील ज्ञानाई भजन मंडळाच्या वतीने ह.भ.प. महादेवबुवा शाहाबाजकर यांच्या सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम पार पडला. भक्तिमय वातावरणात भाविकांनी भजनाचा आनंद घेतला.

युवा उद्योजक नंदकुमार गावडे (भोम) यांच्या प्रायोजकत्वाखाली चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. श्रीया अमोल ठाकूर हिने पटकावला. तिला १,५०० रुपये व ट्रॉफी देण्यात आली. द्वितीय क्रमांक कु. साईश मेघनाथ डाकी आणि वीर जयप्रकाश तांडेल यांनी संयुक्तपणे मिळविला. त्यांना १,००१ रुपये व ट्रॉफी देण्यात आली. तर तृतीय क्रमांक कु. अर्णव विवेक गावंड याने मिळविला. त्याला ५०१ रुपये व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

लहान मुलांच्या खेळांच्या स्पर्धाही उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेसाठी बोरखार गावचे अध्यक्ष श्री. तेजस प्रकाश डाकी यांनी प्रायोजकत्व दिले. स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रणिकेत धर्मेंद्र पाटील याने पटकावला. त्याला ३,००१ रुपये व ट्रॉफी देण्यात आली. द्वितीय क्रमांक सुजल राजेंद्र गावंड याने मिळविला असून त्याला २,००१ रुपये व ट्रॉफी प्रदान करण्यात आली. तृतीय क्रमांक रमेश म्हात्रे याने मिळविला. त्याला १,००१ रुपये व ट्रॉफी देण्यात आली.

यंदाच्या नवरात्रोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे मंडळाच्या वतीने तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या प्रतिकृतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या मूर्तीच्या दर्शनासाठी उरण तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तसेच भाविकांनी भेट दिली.

धार्मिक कार्यक्रमांसोबतच चित्रकला आणि बालक्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचा उपक्रम मंडळाने राबविला. त्यामुळे जय भवानी नवरात्रोत्सव मंडळाचा हा उत्सव भक्ती, कला, शिक्षण आणि क्रीडा यांचा संगम ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.