कोजागिरी पौर्णिमेनिमित्त जीवनदान कपडा परिवाराचा सामाजिक उपक्रम गरजू कुटुंबांना नवीन कपडे, साड्या, चपला व बुटांचे वाटप
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त जीवनदान कपडा परिवाराचा सामाजिक उपक्रम
गरजू कुटुंबांना नवीन कपडे, साड्या, चपला व बुटांचे वाटप
लेवाजगत न्यूज भुसावळ : कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून जीवनदान ब्लड ग्रुप ग्रामीण व शहरी आणि जीवनदान कपडा परिवाराच्या वतीने वाजोळा रोडवरील भारत गॅस गोडाऊनच्या मागील बाजूस असलेल्या पावरी वस्तीमध्ये गरजू कुटुंबांना कपडे व पादत्राणांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरातील लहान मुले, मुली, महिला आणि पुरुषांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
या सामाजिक उपक्रमांतर्गत लहान मुले व मुलींना नवीन ड्रेस, महिलांना साड्या, तर पुरुषांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना चपला, बूट आणि सँडलचे वाटप करण्यात आले. गरजू नागरिकांना मदतीचा हात देत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न जीवनदान कपडा परिवाराने केला.
या वेळी जीवनदान कपडा परिवाराचे अध्यक्ष श्री. सतीश घनश्याम महाजन आणि उपाध्यक्ष चि. पवन मुरलीधर भारंबे यांच्या हस्ते कपडे व पादत्राणांचे वाटप करण्यात आले. वस्तीतील नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद पाहून जीवनदान कपडा परिवाराच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले.
गरजूंना कपडे दान करण्याचे आवाहन
समाजातील गरजू व्यक्तींना मदत करता यावी, यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जीवनदान कपडा परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्याकडील नवीन कपडे किंवा वापरण्यायोग्य जुने कपडे स्वच्छ धुऊन, व्यवस्थित इस्त्री करून दान करावेत. या कपड्यांमुळे गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलू शकतो.
कपडे दान करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा.
संपर्क : 📞 9923791399 📞 8329514825
“आपल्याकडील गरजेपेक्षा जास्त असलेली वस्तू दुसऱ्याच्या गरजेची ठरू शकते; दानातून माणुसकी जपूया!”



कोणत्याही टिप्पण्या नाहीत