विद्यार्थ्यांच्या उद्योजकतेला मिळाले व्यासपीठ; डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘स्टार्टअप मेळा’ उत्साहात
विद्यार्थ्यांच्या उद्योजकतेला मिळाले व्यासपीठ; डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘स्टार्टअप मेळा’ उत्साहात
सावदा लेवाजगत न्यूज प्रतिनिधी
विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची आवड निर्माण व्हावी, तसेच त्यांना आर्थिक व्यवहारांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे, या उद्देशाने डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सावदा येथे ‘स्टार्टअप मेळ्या’चे उत्साहात आयोजन करण्यात आले.
या मेळ्यात विद्यार्थ्यांनी स्वतः विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करून त्यांचे स्टॉल उभारले आणि उत्स्फूर्तपणे विक्री केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना खरेदी-विक्री, आर्थिक नियोजन, पैशांचा योग्य वापर, नफा-तोट्याची संकल्पना आणि हिशोब ठेवण्याचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले.
मेळ्याचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. प्रशांत वारके व हितेश सुपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. प्रशांत वारके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उद्योजकतेचे महत्त्व, व्यवसायातील नियोजन, मेहनत आणि आर्थिक व्यवहारांमधील शिस्त याविषयी मार्गदर्शन केले.
या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भारती महाजन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका शारेन एन्मेकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन शिक्षिका अर्चना इंगळे यांनी केले.
मेळ्यात विद्यार्थ्यांनी उभारलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, आर्थिक साक्षरता, नियोजनकौशल्य आणि उद्योजकतेची भावना विकसित करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत