Contact Banner

भडगावमध्ये गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या दोघांचा पोलिसांना गुंगारा; पाठलागात पोलीस कर्मचारी जखमी लासगाव परिसरातून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती

 

bhadgaon-country-made-pistol-sale-suspects-police-injured

भडगावमध्ये गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या दोघांचा पोलिसांना गुंगारा; पाठलागात पोलीस कर्मचारी जखमी


लासगाव परिसरातून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती


लेवाजगत न्यूज भडगाव : शहरात बेकायदेशीररीत्या गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या दोन तरुणांना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच दोन्ही संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यांचा पाठलाग करताना बाळद रस्त्यावरील गटारीत पडल्याने एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव शहरात दोन तरुण गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित परिसरात सापळा रचून कारवाईची तयारी केली होती. मात्र, पोलिसांच्या हालचालींची कुणकुण लागताच संशयित तरुणांनी तेथून पळ काढला.


पोलिसांनी तत्काळ त्यांचा पाठलाग सुरू केला. या दरम्यान बाळद रस्त्यावरील गटारीत पडल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याला दुखापत झाली. जखमी कर्मचाऱ्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.


दरम्यान, पळून गेलेल्या दोन्ही संशयितांचा शोध घेत असताना ते लासगाव परिसरात आढळून आल्याची आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.


या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे का, तसेच संशयितांबाबतची अधिकृत माहिती काय आहे, याबाबत पोलिसांच्या अधिकृत खुलाशाची प्रतीक्षा आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.