गोदावरी अभियांत्रिकीच्या ६८ विद्यार्थ्यांची नऊ नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी निवड! शिक्षणासोबतच मिळणार उद्योगक्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव; पुणे, मुंबई, हैदराबाद, बंगळुरूमध्ये कामाची संधी
गोदावरी अभियांत्रिकीच्या ६८ विद्यार्थ्यांची नऊ नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी निवड!
शिक्षणासोबतच मिळणार उद्योगक्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव; पुणे, मुंबई, हैदराबाद, बंगळुरूमध्ये कामाची संधी
जळगाव : प्रतिनिधी-
गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या बॅच २०२७ मधील विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप निवड प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या चार शाखांमधील एकूण ६८ विद्यार्थ्यांची नऊ नामांकित आयटी व तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये तीन ते सहा महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. या संधीमुळे विद्यार्थ्यांना पदवीचे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच प्रत्यक्ष उद्योगक्षेत्रातील कामाचा अनुभव मिळणार आहे.
या निवड प्रक्रियेत क्यू स्पायडर (१६), ग्लोबल क्रिएटर (७), एक्सेल आर (५), युनिक सिस्टीम (४), टेक्नो लर्न (५), धी कोडींग (२), सायर सक्सेस (४), किरण अकॅडमी (१६) आणि विस्डम स्प्राऊट्स आयटी (९) अशा नऊ कंपन्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांची निवड अॅप्टिट्यूड टेस्ट, ग्रुप डिस्कशन, टेक्निकल इंटरव्ह्यू आणि एचआर इंटरव्ह्यू अशा विविध टप्प्यांद्वारे करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांचे तांत्रिक ज्ञान, संवादकौशल्य, बौद्धिक क्षमता, समस्या सोडविण्याची हातोटी आणि व्यावसायिक दृष्टिकोन यांचे मूल्यमापन करण्यात आले.
या इंटर्नशिपदरम्यान विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, फुल स्टॅक डेव्हलपमेंट, जावा, पायथॉन, क्लाऊड कम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, सॉफ्टवेअर टेस्टिंग आणि वेब डेव्हलपमेंट यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये प्रशिक्षणासह प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी इंटर्नशिप पूर्ण करण्याचा पर्याय उपलब्ध असून, पुणे, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरू या प्रमुख आयटी केंद्रांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून काम करण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे महाविद्यालयातील शैक्षणिक आणि प्रशिक्षण विभागाचे नियोजनबद्ध मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. विजयकुमार वानखेडे, अधिष्ठाता (शैक्षणिक) प्रा. डॉ. तुषार कोळी, कॉम्प्युटर विभागप्रमुख डॉ. निलेश चौधरी, एआय अँड डीएस विभागप्रमुख प्रा. डॉ. अनिल विश्वकर्मा, ई अँड टीसी विभागप्रमुख प्रा. डॉ. हेमंत इंगळे आणि इलेक्ट्रिकल विभागप्रमुख प्रा. एम. एच. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच प्रा. हेमराज धांडे, प्रा. वेलचंद होले, प्रा. रेश्मा अत्तरदे, प्रा. अमित म्हसकर आणि प्रा. भालचंद्र सुरवाडे यांनी निवड प्रक्रियेचे नियोजन, तांत्रिक तयारी, मुलाखतींचा सराव आणि संवादकौशल्य विकासासाठी विशेष परिश्रम घेतले.
या उल्लेखनीय यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचे अभिनंदन केले.
शिक्षणासोबतच उद्योगक्षेत्रातील अनुभव मिळवून विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत