Contact Banner

प्रा.डॉ.जगदीश खरात यांना ‘ज्ञानश्री पुरस्कार’ प्रदान

 

prof-dr-jagdish-kharat-honoured-with-dnyanshree-award-2026

प्रा.डॉ.जगदीश खरात यांना ‘ज्ञानश्री पुरस्कार’ प्रदान

prof-dr-jagdish-kharat-honoured-with-dnyanshree-award-2026


फैजपूर : प्रतिनिधी-

फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. जगदीश खरात यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील २२ वर्षांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘ज्ञानश्री पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

लोकसेवक कै. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त चेतना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (CIMR), बांद्रा, मुंबई यांच्या वतीने दिनांक २ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई येथे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते प्रा. डॉ. जगदीश खरात यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी चेतना शिक्षण संस्थेचे सचिव मा. आमदार श्री. शिरीषदादा चौधरी, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. मधुमिता पाटील, चेतना इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. संदीप नेमळेकर, डॉ. शालिनी सिन्हा, डॉ. संजय जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली. आपल्या मनोगतात आमदार शिरीषदादा चौधरी यांनी बाळासाहेब चौधरी यांनी महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री म्हणून केलेल्या अतुलनीय कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तर डॉ. मधुमिता पाटील यांनी बाळासाहेब चौधरी यांनी अर्थ, नियोजन, नगरविकास, महसूल आदी महत्त्वपूर्ण खात्यांची जबाबदारी सांभाळली असली, तरी शिक्षण हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता, असे नमूद केले.

या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या एकूण १५ मान्यवरांना ‘ज्ञानश्री पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रा. डॉ. जगदीश खरात यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.