केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा १० ते १४ नोव्हेंबरदरम्यान जळगाव जिल्हा दौरा; मुक्ताईनगरमध्ये मुक्काम
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा १० ते १४ नोव्हेंबरदरम्यान जळगाव जिल्हा दौरा; मुक्ताईनगरमध्ये मुक्काम
लेवाजगत न्यूज जळगाव : केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा राज्यमंत्री ना. रक्षा निखिल खडसे या १० ते १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्यात त्या विविध ठिकाणी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथील राजशिष्टाचार कक्षामार्फत त्यांच्या दौऱ्याचे अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत स्थानिक कार्यक्रम व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी होतील. दुपारी १ ते २ हा वेळ राखीव असून, दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुन्हा स्थानिक भेटी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचा मुक्काम मुक्ताईनगर येथे असेल.
बुधवार, ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत स्थानिक कार्यक्रम व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, दुपारी २ ते ३ राखीव वेळ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुन्हा स्थानिक भेटींचे नियोजन आहे.
गुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत स्थानिक कार्यक्रम, दुपारी १ ते २ राखीव वेळ आणि दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे.
शुक्रवार, १३ नोव्हेंबर आणि शनिवार, १४ नोव्हेंबर रोजीही सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत स्थानिक कार्यक्रम व भेटीगाठी, दुपारी १ ते २ राखीव वेळ आणि दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत स्थानिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व दिवसांत रात्रीचा मुक्काम मुक्ताईनगर येथे राहणार आहे.
या दौऱ्यात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासमवेत श्री. अतुल महाजन, सहाय्यक खासगी सचिव (APS to MoS) तसेच श्री. योगेश शिरोळे उपस्थित राहणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रसिद्ध दौरा कार्यक्रमात नमूद करण्यात आले आहे.
या दौऱ्यामुळे जळगाव जिल्ह्यातील स्थानिक राजकीय व संघटनात्मक घडामोडींना वेग येण्याची शक्यता असून, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत